राज्य पंच शिबीर – २०२४ (हिंगोली)
महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४ चे राज्यस्तरीय खो खो पंच शिबीर हिंगोली जिल्हा अम्यचुअर खो खो असोसिएशन यांच्या सहकार्याने दि. २६ व २७ जुलै, २०२४ या कालावधीत मयूर मंगल कार्यालय, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथे आयोजित करण्यात आले होते.
भारतीय खो खो महासंघाने खो खो खेळाच्या संबधीत नियमांमध्ये काही नविन बदल, सुधारणा केलेल्या आहेत. पुढे सुरु होणाऱ्या विविध स्पर्धांचा कार्यक्रम पाहता महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या सर्व पंच अधिकाऱ्यांना सदर नियमाबाबत अद्यावत करण्यासाठी यंदा हे शिबीर लवकर आयोजित करण्यात आले.
या राज्यस्तरीय पंच शिबिराचे उद्घाटन वसमतचे मान. आमदार श्री. राजूभैया नवघरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोलीचे मान. आमदार श्री. तानाजी मुटकुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राजेश्वर मारावर, हिंगोली जिल्हा अम्यचुअर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. शिवदास बोड्डेवर हे मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव, आंतरराष्ट्रीय पंच व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. प्रा. श्री. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. प्रा. श्री. पवन पाटील, प्रा. श्री. राजेश सोनावणे, सौ. वर्षाताई कच्छाव हे राज्य संघटनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य संघटनेचे कार्यालयीन सचिव डॉ. श्री. प्रशांत इनामदार, हिंगोली जिल्हा अम्यचुअर खो खो असोसिएशनचे सचिव व राज्य तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ. प्रा. नागनाथ गजमल यांच्या व्यवस्थापनात सदर राज्यस्तरीय खो खो पंच शिबीराचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते
सदर शिबीरास महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या पंच मंडळाचे अध्यक्ष श्री. सुधाकर राऊळ, भारतीय खो खो महासंघ व महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या पंच मंडळाचे निमंत्रक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय पंच श्री. प्रशांत पाटणकर, सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच श्री. नानासाहेब झांबरे, सदस्य श्री. शरद व्हनकडे, श्री. किशोर पाटील, डॉ. श्री. रफिक शेख, श्री. संतोष सावंत, श्री. प्रभाकर काळे, श्री. संदेश आंब्रे, श्री. किरण वाघ व सौ. रत्नराणी कोळी यांनी नविन नियमांबाबत उपस्थित पंचांना माहिती दिली.
तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या तांत्रिक समितीचे सचिव, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. श्री. नरेंद्र कुंदर, सहसचिव श्री. आशिष पाटील, सदस्य श्री. निलेश परब, श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा, श्री. महेंद्र गाढवे, कु. प्रियांका चव्हाण यांनी उपस्थित पंचांना अत्याधुनिक साहित्यांचा वापर करत नविन नियमांतील तांत्रिक गोष्टींबाबत माहिती दिली. पंच नोदणी कार्य श्री. कृष्णा करंजळकर व श्रीमती नंदिनी धुमाळ यांनी पार पाडले.
राज्यभर जोरदार पाऊस असतानाही या शिबिरास राज्यातील सुमारे १८० पंच व मान्यवरांची उपस्थिती होती. या पंच शिबिराच्या दोन दिवसांच्या कार्यकाळात खो खो खेळातील नवीन नियमांबाबत माहिती, प्रात्यक्षिक, चर्चा इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक नियमांवर पॉवरपॉइंटच्या माध्यमातून पंचांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
सदर शिबिराच्या समारोपास पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मान. श्री. जयप्रकाशजी दांडेगावकर, कळमनुरीचे आमदार मान. श्री. संतोष बांगर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई तांभाळे, वसमतचे बा.स.कृ. उत्पन्न समितीचे सभापती श्री. तानाजी बेंडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव, आंतरराष्ट्रीय पंच व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. प्रा. श्री. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. प्रा. श्री. पवन पाटील, प्रा. श्री. राजेश सोनावणे, सौ. वर्षाताई कच्छाव हे राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व पदाधिकारी, पंच यांची हिंगोली जिल्हा अम्यचुअर खो खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते यांनी अतिशय उत्तम अशी व्यवस्था केलेली होती.
शिबिरातील काही क्षण……..