५६ व्या पुरुष – महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी चषक………
भारतीय खो खो महासंघाच्या मान्यतेने दि. २९ मार्च ते १ एप्रिल, २०२४ या कालावधीत दिल्ली खो खो असोसिएशनने ५६ व्या पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज, दिल्ली येथे केले होते.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत भारतीय रेल्वेला नमवत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील आतापर्यंतचे ३९ वे अंतिम विजयी पद प्राप्त केले तर महाराष्ट्राच्या महिला संघाने अंतिम फेरीत एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया या संघावर एकतर्फी मात करीत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील आतापर्यंतचा २५ वा विजय मिळविला.
स्पर्धातील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूचा एकलव्य पुरस्कार सुयश गरगटे याला देण्यात आला तर महिला गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार आश्विनी शिंदे हिला देण्यात आला.