खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि छत्तीसगड खो-खो असोसिएशन आयोजित ४२ वी राष्ट्रीय कुमार – मुली गट खो-खो स्पर्धा दि. २६ ते ३० डिसेंबर, २०२४ या कालावधीत अलोन्स पब्लिक स्कूल, बिजाभट, बेरला रोड, बेमतारा, छत्तीसगड येथे संपन्न झाली. महाराष्ट्राने याही वर्षी दुहेरी मुकुट मिळवला.

महाराष्ट्राच्या कुमार संघाने कोल्हापूर संघास तर मुलींच्या संघाने ओडीसा संघास मात देत स्पर्धेतील अजिंक्यपद प्राप्त केले.

या स्पर्धेतील कुमार गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार वैभव मोरे (ठाणे) याला तर मुलींच्या गटात जानकी पुरस्कार सानिका चाफे (सांगली) हिला देऊन गौरवण्यात आले.