खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा दि. १३ ते १७ डिसेंबर, २०२३ या कालावधीत कल्पतरू क्रीडांगण, टीपटूर, जिल्हा टुमकूर (कर्नाटक) येथे संपन्न झाली. महाराष्ट्राने लागोपाठ तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राने दुहेरी मुकुट मिळवला.

सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी कर्नाटकच्या दोन्ही संघांचा पराभव करत आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. या स्पर्धेच्या अंतीम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी व किशोरींनी कर्नाटकवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवले.

या स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार किशोर गटात हाराध्या वसावे (धाराशिव) याला तर किशोरींच्या गटात ईला पुरस्कार मैथिली पवार (धाराशिव) हिला देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राचे दोन्ही कर्णधार या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले.