खो खो.....

 

खो-खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खर्‍या अर्थाने झाला. ज्येष्ठ सांख्यिकीतज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो-खो” या पुस्तकात मांडलेल्या खालील तर्क पटण्यालायक वाटतो. आपला देश हा शेतीप्रधान भारतीय संस्कृतीचा अविष्कार आहे. पिकांनी भरलेली शेती जनावरांनी खराब करू नये म्हणून जे विविध उपाय योजले जात असत त्यापैकी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करून त्यांना पळवून लावणे हा प्रमुख उपाय असे. त्यासाठी शेतात काही ठराविक अंतरावर लहान मुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवून त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज (भो भो) करायला सांगितले जात असावे. असे या शेत (क्षेत्र) रक्षणवृत्तीतून लहान मुलांचा खो-खो खेळ-पळती / पाठलागाचा सुरु झाला असावा.

आमची ओळख.....

१९६० ते १९६५ या काळामध्येच महाराष्ट्राने खो-खो जगाला सांख्यिकिचे महत्त्व पटवून दिले. खो-खो खेळाची आणि खेळाडूंच्या नैपुण्याची सांख्यिक नोंद ठेवण्याचे काम महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने प्रत्यक्षात १९६८ सालापासून सुरु केले. श्री. रमेश वरळीकर जेष्ठ सांख्यिकि तज्ञ म्हणतात भारतीय खो-खो क्षेत्रात महाराष्ट्र खो खो असोसिएशन हीच एकमेव राज्य संघटना आहे कि जिने खो-खो मध्ये सांख्यिकीची उपयुक्तता आणि महत्त्व जाणून प्रत्यक्षात आणले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष नामदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सर्वांगीण प्रयत्नामुळे खो-खो हा खेळ आशियाई पातळीवर पोहोचला.

आमचे प्रेरणास्थान

मा. श्री. अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विशेष घटना

उस्मानाबाद जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू, भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, तालुका क्रीडा अधिकारी, सुवर्णकन्या कु. सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील भारतातील सर्वाच्च मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!!

सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव याच्या समवेत कु. सारिका काळे

चालू घडामोडी