५६ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा – सोलापूर Reviewed by Momizat on . ५६ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा यंदा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने दि सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनने उत्कर्ष क्रीडा मंड ५६ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा यंदा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने दि सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनने उत्कर्ष क्रीडा मंड Rating: 0

५६ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा – सोलापूर

५६ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा यंदा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने दि सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनने उत्कर्ष क्रीडा मंडळ व ह. दे. प्रशाला, सोलापूर यांच्या सहकार्याने दि. १२ ते १५ डिसेंबर, २०१९ या कालावधीत ह. दे. प्रशाला, सोलापूर येथे आयोजित केली होती.
या स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगर खो खो संघटना तर महिला गटात पुणे जिल्हा खो खो संघटना यांनी विजेते पद मिळविले. पुरुष गटात पुणे (द्वितीय), सांगली (तृतीय), ठाणे (चतुर्थ) तर महिलांच्या गटात ठाणे (द्वितीय), रत्नागिरी (तृतीय) तर उस्मानाबाद (चतुर्थ) स्थानावर राहिले.
यावर्षीपासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनने खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या धर्तीवर पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूस राजे संभाजी पुरस्कार तर महिला गटातील सर्वोकृष्ट खेळाडूस राणी अहिल्या पुरस्कार देण्याचे ठरविले आहे.
यावर्षीचा या पुरस्काराचा मान पुरुष गटात मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ऋषिकेश मुर्चावडे याला तर महिला गटात पुणे जिल्हयाच्या काजल भोर हिला प्राप्त झाला.

 

२०२० © रचना आणि मांडणी बियाँड वेब

loading
Scroll to top