५२ वी पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा (२०१८-१९) राजस्थान Reviewed by Momizat on . अखिल भारतीय खो खो महासंघ यांच्या मान्यतेने राजस्थान खो खो असोसिएशनने दिनांक २४ ते २८ मार्च, २०१९ या कालावधीत चौगान स्टेडियम, जयपूर, राजस्थान येथे आयोजित केलेल्य अखिल भारतीय खो खो महासंघ यांच्या मान्यतेने राजस्थान खो खो असोसिएशनने दिनांक २४ ते २८ मार्च, २०१९ या कालावधीत चौगान स्टेडियम, जयपूर, राजस्थान येथे आयोजित केलेल्य Rating: 0

५२ वी पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा (२०१८-१९) राजस्थान

अखिल भारतीय खो खो महासंघ यांच्या मान्यतेने राजस्थान खो खो असोसिएशनने दिनांक २४ ते २८ मार्च, २०१९ या कालावधीत चौगान स्टेडियम, जयपूर, राजस्थान येथे आयोजित केलेल्या ५२ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत (२०१८-१९)  महाराष्ट्राने दुहेरी विजय संपादन केला.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने गतविजेत्या भारतीय रेल्वेवर विजय मिळविला तर महाराष्ट्राच्या महिला संघाने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया संघावर विजय मिळवीत विजयाची परंपरा कायम ठेवली.
 
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूचा एकलव्य पुरस्कार महाराष्ट्राच्या श्री. प्रतीक वाईकर तर महिला गटात सर्वोकृष्ट खेळाडूचा मान कु. काजल भोर हिने मिळविला. 
 
पुरुष गट – 
उत्कृष्ट संरक्षक – श्री. अमित पाटील (भारतीय रेल्वे)
उत्कृष्ट आक्रमक – श्री. अनिकेत पोटे (महाराष्ट्र)
महिला गट –
उत्कृष्ट संरक्षक – कु. ऐश्वर्या सावंत (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया)
उत्कृष्ट आक्रमक – कु. प्रियांका इंगळे (महाराष्ट्र)

२०२० © रचना आणि मांडणी बियाँड वेब

loading
Scroll to top