आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष व महिला गट खो खो स्पर्धा – इंग्लंड Reviewed by Momizat on . दिनांक १ ते ४ सप्टेंबर, २०१८ या कालावधीत इंग्लंड येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष व महिला गट खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता भार दिनांक १ ते ४ सप्टेंबर, २०१८ या कालावधीत इंग्लंड येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष व महिला गट खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता भार Rating: 0

आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष व महिला गट खो खो स्पर्धा – इंग्लंड

दिनांक १ ते ४ सप्टेंबर, २०१८ या कालावधीत इंग्लंड येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष व महिला गट खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता भारतीय संघात खालील खेळाडूंची निवड भारतीय खो खो महासंघातर्फे करण्यात आली आहे.

पुरुष संघ :

बाळासाहेब पोकार्डे, शिवा रेड्डी, अजित चौधरी, साहिल सिंग, अनिकेत पोटे, गुरुप्रसाद कित्तुरे, हर्षद हातणकर, महेश मनियान, प्रतिक वाईकर, सुरेश सावंत, अनिकेत चिंतामण, जुनैद अली, भूपेंद्र चौधरी व अजय मांद्रा.

श्री. अखीलेश्वर प्रसाद (व्यवस्थापक), श्री. राजेंद्र साप्ते (प्रशिक्षक)

महिला संघ :

निशा प्रवीण, पौर्णिमा सकपाळ, नसरीन, कृष्ण यादव, निकिता, सारिका काळे, प्रियांका भोपी, शीतल भोर, ऐश्वर्या सावंत, शश्मिता नाथ, रसी गांगुला, वर्षा श्रीधरन व कलावाणी कार्तीकयन.

सौ. रेखा शर्मा (व्यवस्थापिका), सौ. शीतल चव्हाण (प्रशिक्षका)

 

या भारतीय संघात महाराष्ट्रातील बाळासाहेब पोकार्डे, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर, प्रतिक वाईकर, सुरेश सावंत या पुरुष खेळाडूंची तर पौर्णिमा सकपाळ, सारिका काळे, प्रियांका भोपी, शीतल भोर, ऐश्वर्या सावंत या महिला खेळाडूंची निवड झालेली आहे. पुरुष संघाचे प्रशिक्षक श्री. राजेंद्र साप्ते व महिला संघाच्या प्रशिक्षका म्हणून सौ. शीतल चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राचेच प्रतिनिधित्व करीत आहेत.

भारतीय खो खो महासंघाचे सहकार्यवाह डॉ. प्रा. श्री. चंद्रजीत जाधव यांची या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता सामना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर भारतीय खो खो महासंघाचे पंच मंडळ सचिव श्री. प्रशांत पाटणकर यांची स्पर्धेचे प्रमुख सामना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

काही क्षणचित्रे 

 

co.uk/wp-content/uploads/Hosting-India-KKFE.pdf

२०१८ © रचना आणि मांडणी बियाँड वेब

loading
Scroll to top